टीम आवाज मराठी, मुंबई /जळगाव दि. 12 ऑक्टोबर 2024 (वृत्तसंस्था ) ;-: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ला प्रकरणे दोन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची माहिती मिळते आहे. लिलावती रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दीकी यांच्यावर आज (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला. निर्मल नगर भागात फटाके वाजत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले होते. यातील एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागली.
या घटनेनंतर त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्त समजताच त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी तातडीने लिलावती रुग्णालयात धाव घेतली.