निराधरांना रोहित निकम यांनी दिला मदतीचा आधार
वाढदिवसानिमित्त चक्की, शिलाई मशिनचे वाटप करून जपले समाजाचे हित

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक २८ सप्टेंबर २०२३ |
वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस.. कुणी हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करतो, तर कुणी समाजातील वंचीत घटकांना मदत करून त्यांच्या आनंदात आपला आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करीत असतो. आज असाच एक वाढदिवस चर्चेत राहिला तो म्हणजे रोहित निकम यांचा… सहकार क्षेत्रातील विकासात्मक कामे, दुध संघातील संचालक पदाची जबाबदारी यासह व्यावसायिक प्रपंच सांभाळत सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम रोहित निकम यांनी केलंय….
कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्यानंतर निर्माण झालेलं संकटाला सामोर जाण्यासाठी पाठबळ रोहित निकम यांनी मदतीचा हात पुढे करून एक मोठा आधार निर्माण करून दिलाय. रूख्मिणी फाऊंडेशन मिड टाऊन तर्फे आयोजित कार्यक्रम आर्थिक सहकार्य रोहित निकम यांनी केलंय. यात पाचोरा तालुक्याती वरखेडी येथील वनिता कडू बाशिंदे, यांना उदरनिर्वाह भागविण्यासाठी चक्की देण्यात आलीये. तर अमळनेर येथील रत्ना ज्ञानेश्वर बडगुजर यांना शिलाई मशिनसह मशिन चालविण्यासाठी इलेक्ट्रीक मोटर देखील लावून दिलीये. यामुळे निराधार असलेल्या या महिलांना रोहित निकम यांच्या माध्यमातून एक महत्वाचा आधार मिळालाय. ज्याचे मोल आपण कधीही विसरू शकत नसल्याची प्रतिक्रीया या मिहिलांनी व्यक्त केलीये.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. दिपक पाटील, लक्ष्मी ऑग्रोचे संचालक बाळासाहेब सुर्यवंशी, तरूण भारतचे विश्वस्त रवींद्र लढ्ढा, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्जला बेंडाळे, माजी नगरसेवक अमित काळे, जिल्हा मार्केटींक फेडरेशनचे उपाध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष, जिल्हा बँकेच्या संचालक शैलेजा निकम, श्वेता निकम, जितेंद्र लाठी, राष्ट्रवादीचे वाल्मिक पाटील हे उपस्थित होते. तर रूख्मिणी फाऊंडेशनचे शितल जैन, पंकज जैन, डॉ. अमित वर्मा, डॉ. विजय साखला राहूल राका, योगेश निबाळकर या कर्यक्रमास सहकार्य केलंय.