आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा। २४ जून २०२३ । चोपडा येथील लोकनृत्य ग्रुप यांनी अखिल भारतीय कलाकार असोशियन द्वारा शिमला ( हिमाचल प्रदेश) येथे आयोजित नृत्य स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील पोतराज हे लोकनृत्य यासंघाने सादर केले. यात पोतराज लोकनृत्यचा सिनियर गटात दुसरा क्रमांक आला.
शिमला येथे ६ जून ते १० जुन पर्यंत आयोजित ६८ व्या अखिल भारतीय नृत्य व नाटक स्पर्धेत २२ राज्यातील कलाकारांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील नागपुर, बीड, पनवेल व जळगांव (चोपडा) येथील संघांनी सहभाग घेऊन लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची ओळख करून दिली. पोतराजची भूमिका चोपडा येथील करोडपती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व लासुरचे माजी सरपंच देवीलाल बाविस्कर सर साकारली होती.
त्यांना जागृती वाडे, कोमल पारधी, सुजाता अहिरे, अश्विनी महाजन, उज्वला वाघ यांनी साथ दिली. या पोतराज लोकनृत्य संघाने दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे रोहितास गौर, रेखा गौर, ऋषिकेश सर, विट्ठल ओंकार पाटील, अनिल हिंमतराव पाटील, ए के गंभीर, अमृतराव वाघ, दिलिप श्रावण कोळी, श्रीराम पालीवाल, दिलिप पालीवाल, आत्माराम पाटील, कुंदन बोरसे, संजय अहिरे, अनिल वाडे यांनी अभिनंदन केले आहे.