जळगाव

अखेर अंजनी धरण भरले १०० टक्के पूर्ण, रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरु..!

गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.पी.अग्रवाल व उप अभियंता एस.पी.चव्हाण यांची माहिती

उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | २५ सप्टेंबर २०२३ | एरंडोल व धरणगाव तालुक्याचे लाइफलाईन असलेले अंजनी धरण यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे भरणार की नाही तसेच गिरणा धरणात ही अद्याप पुर्ण साठा झालेला नाही त्यामुळे अंजनी धरणाचे पुनर्भरण कसे होणार..? या विवंचनांच्या पार्श्वभूमीवर चिंता पसरली होती. मात्र अखेर गणेशोत्सव काळात गणपती बाप्पा च्या कृपेने धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालाआणि अखेर अंजनी धरण शंभर टक्के भरले. अंजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे २४ सप्टेंबर २०२३ रोजी रविवारी दुपारी १२वाजेपासून धरणातून १०० क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.पी.अग्रवाल व एरंडोल गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उप अभियंता एस.पी.चव्हाण यांनी दिली आहे.

अंजनी धरणात पाण्याची आवक सध्या भरपूर होत आहे त्यामुळे अंजनी धरणाचे तिन्ही दरवाजे प्रत्येकी ३० क्यूसेक ने उघडून अंजनी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान,
अंजनी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊ शकतो तरी अंजनी नदीकाठावरील गावांच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button