जळगाव
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा संशयित एलसीबीच्या जाळ्यात
संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

टीम आवाज मराठी, जळगाव | ३१ ऑगस्ट २०२३| जळगाव जिल्ह्यातील तलवारीचा धाक दाखवून दहशत माजविणारा मोहाडीतील संशयिताला जळगाव गुन्हे शाखेने अटक करण्यात आली आहेत. संशयिताकडून तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. हर्षल विनोद राजपूत असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रितम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, अशोक पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी आदींनी गोपनीय माहितीवरून ही कारवाई केली.
