Blogजळगाव

लिलाताई गोल्हाईत शाळेत १५ आॉगस्ट स्वातंत्र्यदिन सांस्कृतिक कार्यक्रमासह उत्साहात साजरा

पथराडचे सरपंच उत्तम सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

टीम आवाज मराठी धरणगांव प्रतिनिधी | दि १५ ऑगस्ट २०२३ | आज संपूर्ण देशात सर्वत्र १५ ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाच्या निमित्ताने धरणगांव  तालुक्यातील पथराड बु. येथील श्रीमती लिलाताई गोल्हाईत इंग्लिश स्कूलच्या आवारात विद्यमान सरपंच उत्तम सोनवणे यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी श्री उद्धवराव गोल्हाईत चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद संस्थेचे चेअरमन मायादेवी गोल्हाईत व्हाईस चेअरमन प्रकाश मेढे संचालक प्रभावती मेढे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मंडळ व गावातील इतर प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेचे  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमाची रूपरेषा सर्वप्रथम ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रगीत झाले त्यानंतर सरपंच उत्तम सोनवणे यांनी आपले स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत असताना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गावाच्या विकासा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे चेअरमन मायादेवी गोल्हाईत व संचालक प्रभावती मेढे यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात नवीन आधुनिक योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्याध्यापिका अनीता मॅडम तर आभार प्रदर्शन पूनम व्यवहारे यांनी केले तसेच माजी सरपंच इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक सैंदाणे यांच्या सह इतर संचालक मंडळ सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर गावकरी वर्ग ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी शाळेचे मोनाली मॅडम, मयूरी मॅडम, कल्याणी मॅडम, शोभा मॅडम, मनीषा मॅडम, देविका गोल्हाईत प्रवीण गोल्हाईत आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button