जळगाव

जळगांवात भरारी फाऊंडेशन तर्फे बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन

आमदार राजू मामा भोळे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाची सुरूवात

 

टीम आवाज मराठी, जळगाव दि. 25 जानेवारी 2024  खान्देशातील लोकसंस्कृतीची ओळख असलेला जळगावातील महा-महोत्सव अर्थातच बहिणाबाई महोत्सवास गुरुवार दि. २५ जानेवारी पासून सरूवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आमदार सुरेश भोळे यांनी उत्सवाचे उद्घाटन केले.

या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीत, वहीगायन, भावगीते, मराठी संस्कृतीचा फॅशन शो, लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस कला सादर करणार आहेत. खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागर सखींचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा झाली. आमदार सुरेश भोळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जळगांव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, डॉ. पी. आर चौधरी, अनिल कांकरीया, कुशल गांधी, पवन जैन, राजेश पाटील, नितीन सपके, सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, सचिन महाजन, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, स्वप्नील वाघ, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, भगवान तिवारी, विक्रांत चौधरी, महेश पाटील यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी कलांचे सादरीकरण केले. उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीं व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button