जळगाव

ग्रंथालय कर्मचाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगावात शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकार

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक १ नोव्हेंबर २०२३ |  येथील जळगाव शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या ग्रंथालयातील  पुस्तक जमा करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय विद्यालयातील विद्यार्थिनीचा ग्रंथालय परिचर कैलास दत्तात्रय कडभाने (वय ५२, रा. समर्थ कॉलनी, रामानंद नगर) या कर्मचाऱ्याने विनयभंग केला. सदरहू घटना २६ ऑक्टोबर रोजी घडली असून या प्रकरणी मंगळवार, ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी विद्यार्थिनीने रामानंद नगर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर जिल्ह्यातून जळगाव येथे आजीकडे शिक्षणासाठी आलेली एका २० वर्षीय विद्यार्थिनी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत आहे. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा आटोपल्या नंतर ही विद्यार्थिनी ग्रंथालयात आपले पुस्तक जमा करण्यासाठी गेली असता तेथील  ग्रंथालय परिचर कैलास कडभाने या कर्मचाऱ्याने दुसऱ्या दिवशी परीक्षा असलेल्या विषयाचे पुस्तक घेऊन जाण्याविषयी आग्रह केला असता सदर विद्यार्थिनीने नकार दिला तरी तो वारंवार पुस्तक नेण्या विषयी तिला समजून सांगत होता. तेथे ही विद्यार्थिनी सही करीत असताना कडभाने याने तिला स्पर्श केला. चुकीने धक्का लागला असेल म्हणून विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले.

ग्रंथालयातून जात असता कडभाने या कर्मचाऱ्याने तिचे बोट पकडून दरवाजा मागे ओढले व तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत तीने कशीतरी सुटका करून घेत घर गाठले व आजीला हकीकत सांगितली. नंतर विद्यार्थिनीने विद्यालयातील शिक्षिकेलाही याची माहिती दिली.  सदर विद्यार्थिनीने ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामांनद नगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यावरून कैलास कडभाने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button