आमदार चंद्रकांत पाटीलांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा अध्यक्षांवर शिंदे गटाकडून करण्यात आला गुन्हा दाखल
जिया शेख, बोदवड | दिनांक 17 सप्टेंबर 2023
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या विषय आक्षेपार्य शब्दात सोशल मीडियावर पोस्ट केली म्हणुन शिवसैनिक पदाधिकारी व नगरसेवक यांनी आज बोदवड पोलिस स्टेशन मधे ठाकरे गटाच्या उपजिल्हा अध्यक्ष विनोद पाड़र यांच्यावर गुन्हा दाखला केला आहे.
आमदारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक वर टाकल्याने बोदवड गावामध्ये आज शेकडोच्या संख्येत शिवसैनिक बोदवड पोलीस स्टेशनला उपस्थित होते व पोस्ट टाकणाऱ्या विनोद पाडर यास त्वरित अटक करावी अशी मागणी शिवसैनिकांनी ठिया मांडत केली.
रात्री 12 वाजेपर्यंत शेकडो शिवसैनिक पोलीस स्टेशन बाहेर ठाण मांडून होते व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास त्वरित अटक करावी अशी मागणी ते करत होते. शेवटी गुन्हा दाखल झाल्यावर शिंदे गट शिवसैनिकानी ठिया आन्दोलन मागे घेतले.
या सर्व घडामोडीत बोदवड येथील राजकारण चांगलेच पेटले आहे. विनोद पाडर हे खडसें समर्थक असल्याणे आता त्यांच्या वतीने पुढील क़ाय पाऊल उचलले जाते या कड़े नागरीकांचे लक्ष लागून आहे.