राज्य

लग्न करण्यासाठी नकार दिल्याने महिलेने केले चक्क तरुणाचे अपहरण : पुणे शहरातील घटना

लग्न करण्यासाठी नकार दिल्याने महिलेने केले चक्क तरुणाचे अपहरण

टिम आवाज मराठी दि. १ जुलै २०२३:- शिक्षणाचे माहेरघर ओळखले जाणारे आज पुणे शहरातील दिवसेंदिवस वाढत असलेली गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी घडलेली असताना आता लगेचच लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने एका तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे येथील कोंढवे धावडे परिसरातील ही घटना घडली होती. पुणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मूळचा सोलापूरचा येथील असलेला २३ वर्षीय तरुण पुण्यामध्ये एनडीए रोड परिसरात रहायला होता. त्यावेळी त्याचे तिथे राहत असलेल्या २८ वर्षाच्या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. पण त्या तरूणाच्या आई वडीलांनी त्याचे लग्न दुसर्‍याठिकाणी ठरवले आणि त्यास सोलापूर येथे घरी बोलावून घेतले. त्यामुळे नोकरी सोडून तो सोलापूरला निघून गेला. प्रेमसंबंध तोडल्याने विवाहित महिला चांगलाच संताप आला आणि तिने त्या तरूणाचा अपहरणाचा कट रचला. यासाठी तिने काही सराईत गुन्हेगारांना याची सुपारी देण्यात आली. चार-पाच दिवसापूर्वी सदर महिलेने अपहरणकर्त्यां सोबत त्या तरुणाचे अपहरण करुन, गुजरात राज्यातील वापी या ठिकाणी घेऊन गेली. उत्तमनगर येथे पोलिस स्टेशनमध्ये याची तक्रार झाल्यानंतर पोलीसांनी तपासात असे निष्पन्न झाले कि, तरुणाचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचे एनडीए रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात दिसून आल्यानंतर पोलीसांनी पुढील मार्ग काढुन गुजरातमधील वापी येथील हॉटेलवर छापा टाकत तरुणाची सुटका केली. या घटनेची चांगलीच जिल्ह्यात जनतेत चर्चा होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button