टीम आवाज मराठी । २२ जून २०२३ । आदीपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाचा भोव-यात सापडला आहे. दरोरोज होत असलेले विरोधामुळे या चित्रपटाच्या संवादात आता काही बदल करण्यात आले आहेत.
आता आदिपुरुष चित्रपटात तुम्हाला भगवान हनुमानाच्या तोंडून “जलेगी भी तेरे बाप की…” सारखे संवाद ऐकायला मिळणार नाहीत. या संवादात निर्मात्यांनी बदल केले आहेत. आता या संवादात पुढील प्रमाणेबदल पहायला मिळणार आहेत. “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग तेरी बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की” या अत्यंत वादग्रस्त संवादाऐवजी हनुमान म्हणताना दिसणार आहे- “कपड़ा तेरी लंका का, तेल तेरी लंका का, आग तेरी लंका की, तो जलेगी भी तेरी लंका ही।
मंगळवारपासून चित्रपटात हे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय इतर काही संवादही बदलण्यात आल्याचे पहायला मिळतंय. तथापि, भाषेत फारसा बदल झालेला नाही, फक्त काही शब्द बदलले आहेत. उदाहरणार्थ, जिथे प्रभु हनुमान यांना तू म्हणतात, तिथे तुम्ही असा उच्चार करण्यात आला आहे. “लंका लगा देंगे ऐवजी लंका में आग लगा देंगे” असा बदल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावरून समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये हा बदल दिसून आला. असे अनेक संवाद ज्यात पूर्वी तू आणि तेरे सारखे शब्द वापरले जात होते, तेही बदलून तुम आणि तुम्हारा असे करण्यात आले आहेत. यापूर्वी, प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टपोरी संवादांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर निर्मात्यांनी ते बदलण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, मंगळवारी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी घट नोंदवण्यात आली. पाचव्या दिवशी या चित्रपटाने जगभरात केवळ 20 कोटींची कमाई केली आहे आणि केवळ 10 कोटींची कमाई संपुर्ण भारतातून केली आहे. यासह चित्रपटाने आतापर्यंत 395 कोटींची कमाई केली आहे. प्रभास आणि क्रिती सेनन स्टार हा चित्रपट रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे.