“स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमातून शेळीपालन व पशूपालन व्यवसाय करण्याची सुवर्णसंधी”
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ४ दिवसीय शेळीपालन आधारित स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ६ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ४ दिवसीय शेळीपालन आधारित स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे दि. १२ सप्टेंबर २०२३ ते १५ सप्टेंबर २०२३ दरम्यान आयोजन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव मार्फत उद्योग सुरू इछित असणाऱ्या साथी खास शेळीपालन व पशूपालन वर आधारित स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र जळगाव येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाचा उद्देश हा शेतीवर आधारित उद्योग करणारे उद्योजक असून प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेती व पशूच्या निवडीपासून ते उद्योग उभारणी पर्यंत तज्ञामार्फत संपूर्ण मार्गदर्शन देण्यात येणार आहे त्यामध्ये शेळीच्या जाती – प्रजाती खाद्य पदार्थ नेणारे आजार, लसीकरण, शेड उभारणी, चार साठवण्याच्या पद्धती याबाबत मार्गदर्शन, अनुदान योजना विविध वित्तीय महामंडळाकडून मिळणारे अनुदान, मार्केटिंग, मार्केट सर्वे, प्रकल्प अहवाल, उद्योगासाठी लागणारे विविध परवाने, लघ्उद्योगाचे फायदे, उद्योग उभारणीचे टप्पे, उद्योग व्यवस्थापन तंत्र मंत्र, यशस्वी उद्योजकांशी संवाद, उद्योग घटकांना भेटी, उद्योगासाठी लागणारी संपूर्ण माहिती देऊन उद्योग उभारणी पर्यन्त वेळोवेळी सहाय्य करण्यात येणार आहे यासाठी जास्तीतजास्त लोकानी सहभाग नोंदवावा असे आवाहन दिनेश गवळे क. प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव लाभयार्थ्यानी नांव नोंदणीसाठी व्ही. आर. सैंदाणे कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) शेजारी, जळगाव फोन नं. ०२५७-२२५३६२३ मोबा. ८२०८६६६४५८ / ९७६४३३००११ संपर्क साधावा.