टीम आवाज मराठी, जळगाव (प्रतिनिधी) दि. 2 ऑक्टोबर 2024 : के.सी.ई सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सर्वप्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोला माल्यर्पण करण्यात आले. त्यानंतर मू. जे. महाविद्यालय, ओरियन सी.बी.एस.सी स्कूल, ए.टी झांबरे विद्यालय परिसरातील साफ सफाई करण्यात आली व महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

विद्यार्थिनी हर्षदा पाटील हिने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आपले विचार मांडले. प्राचार्य डॉ अशोक राणे यांनी जगात शांतते साठी आजच्या पिढीला महात्मा गांधींचे विचार आवश्यक आहे असे सांगितले. लाल बहादूर शास्त्री यांनी भारताच्या बिकट परिस्थितीत , भारताला अन्नधान्यासाठी स्वावलंबी केले आणि दुसरी कडे 1965 चा युद्ध जिंकून जय जवान जय किसान चा नारा देत भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन प्राचार्य अशोक राणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रंजना सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मयूर गावित यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
मूळजी जेठा महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सेवा ही स्वच्छता या मोहिमेचा समारोप करण्यात आला. महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात महाविद्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स .ना भारंबे यांनी भुषवले. प्रसंगी सद्भावना दौड घेण्यात आली या दौडचे उद्घाटन प्राचार्य स.ना.भारंबे यांनी हिरवी झेंडा दाखवून केले. महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी पोस्टर तयार करून या पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन झाले . कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जुगल किशोर दुबे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांचा जीवनपट उलगडून दाखविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल देशमुख, सहाय्य कार्यक्रमाधिकारी डॉ.अखिलेश शर्मा व महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.जयश्री भिरुड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमालाव बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.
के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविदयालयात् महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाला महाविदयालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी, डॉ प्रज्ञा विखार, प्रा.हर्षा देशमुख,प्रा.डॉ विणा भोसले,प्रा.गणेश पाटील, प्रा.के बी पाटील,प्रा.दर्शन ठाकूर,प्रा.राहुल पटेल,प्रा.प्रसाद कुलकर्णी, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन प्रा.विजय चौधरी यांनी केले.