चोपडा पोलिसांनी केली घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक
आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा | २२ जून २०२३ | चोपडा शहरामध्ये व परिसरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले आहे.
चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व आठ कर्मचारी शहरात दैनंदिन गस्त घालत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार साबळे, संतोष चव्हाण हे गस्त घालत असताना गोरगावले रस्त्यावरील समर्थ पार्क कॉलनी परिसरात २२ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्रशांत वारडे राहणार गोरगावले हा संशयितरित्या फिरत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केल्या असता सुरुवातीला त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. सखोल चौकशी केली असता त्याच्याजवळ घरफोडी, चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य लॅपटॉप मिळून आले.
चोपडा शहर पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 35 हजाराचे मुद्देमाल व चोरीची एक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीने अजून अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे नाकारता येत नसल्याने त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
