महर्षी कण्व आश्रमतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर
टीम आवाज मराठी जळगाव-दि. १४ ला सकाळी ८.३० ते १.३० वाजेपर्यंत तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम कानळदा येथे करण्यात आले आहे.
जळगाव दि. ११ प्रतिनिधी – कानळदा येथील तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम येथे श्री स्वामी चंद्रकिरण सरस्वती यांच्या आर्शिवादाने व स्वामी अव्दैतानंद चंद्रकिरण सरस्वती यांच्या पुढाकाराने कानळदा व परिसरातील नेत्र रूग्णांच्या सेवेकरिता भव्य शिबीराचे आयोजन गुरूवार, दि. १४ ला सकाळी ८.३० ते १.३० वाजेपर्यंत तीर्थक्षेत्र महर्षी कण्व आश्रम कानळदा येथे करण्यात आले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य (SICS) पद्धतीने विना घडीच्या लेन्ससह मोतीबिंदू शस्त्रक्रिया मशिनद्वारे घडीच्या लेन्ससह रूपये ५३०० पासून पुढे पर्याय उपलब्ध आहेत. जळगाव येथील कांताई नेत्रालयामध्ये जाण्यायेण्याची सुविधा याठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आली आहे. डोळ्यातील मागील पडद्याचे विकार, काचबिंदू डोळ्यावरील साय काढणे, लहान मुलांमधील तिरळेपणा आदींवरील उपचार व शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत संपूर्ण विनामूल्य आहे. यासाठी येताना सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड आणावे अधिक माहितीसाठी स्वामी अद्वैतानंद सरस्वती (९४२३१८५३५६), श्री. खेवलकर (७७९६१५०९५३) यांच्याशी संपर्क करावा. नेत्र तपासणी शिबिराचा आवश्यकता असणाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.