नंदुरबार

नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज करावा

सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांचे आवाहन

टीम आवाज मराठी, नंदुरबार। २२ जून २०२३ । एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी नामांकित निवासी शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठी ७ जुलै, २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज २२ जून २०२३ पासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा, जि.नंदुरबार, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती,तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, पंचायत समिती,अक्कलकुवा तसेच गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, पंचायत समिती,धडगांव येथे ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज शासकीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा जि.नंदुरबार येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

प्रवेशासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत, दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, दिव्यांग असल्यास सक्षम दाखला जोडावा. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्य प्रमाणपत्राची प्रत जोडावी. पालकांच वार्षिंक उत्पन्न 1लाखापेक्षा जास्त नसावे. (सोबत २०२२-२३ वर्षांचे उत्पन्न दाखला जोडावा)

विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत हमीपत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ६ वर्ष पूर्ण असावे. अर्जासोबत २ पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडावे. प्रवेशा बाबतच्या अटी व शर्ती प्रवेश अर्जात नमूद असून प्रवेश अर्ज परीपुर्ण भरुन ७ जुलै,२०२३ रोजी जमा करावेत. प्रवेशासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button