जळगाव

महसूल विभागाच्या सौजन्य सप्ताहात बोडवडच्या महसूल कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

रेशनकार्डात नाव कमी व वाढविण्यासाठी एक हजाराची लाच घेताना पुरवठा विभागाच्या लिपीकाला पकडले

टीम आवाज मराठी बोडवड प्रतिनिधि | २ ऑगस्ट २०२३ | जळगाव जिल्ह्यात लाचखोरांचे प्रमाण खूप वाढले असून या कारणाने संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. रेशनकार्डमध्ये नाव कमी करणे अथवा नाव वाढविण्यासाठी रुपये १०००/-ची लाच मागणाऱ्या पुरवठा विभागातील कार्यरत असलेल्या लिपीकाला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडला आहे, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील तक्रारदाराच्या रेशनकार्डावर आईचे व मुलाचे नाव कमी करून नवीन रेशनकार्ड करण्यासाठी बोदवड तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केला होता. हे काम करण्यासाठी पुरवठा विभागाचे लिपिक उमेश बळीराम दाते (वय ५५) रा बोदवड जि.जळगाव याने १ हजार रुपयांची मागणी केली, म्हणून तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. एक हजार रुपयांची मागणी केल्यानंतर बोदवड तहसिल कार्यालय येथे स्वतः रुपये १०००/-ची लाच स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button