जळगाव

धर्मरथ फाउंडेशन तर्फे इंदिराबई पाटणकर शाळेत चित्रकले स्पर्धेचे आयोजन

९ विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरुपात शालेपयोगी वस्तूंचे वाटप

टीम आवाज मराठी जळगाव | २६ जुलै २०२३ | धर्मरथ फाउंडेशन तर्फे इंदिराबई पाटणकर मराठी शाळा , जळगाव येथे दि  २०/०७/२०२३ रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज दि. २५/०७/२०२३ रोजी सकाळी ९  वाजता धर्मरथ फाउंडेशन तर्फे इंदिरा बाई पाटणकर नवीन मराठी शाळा , जळगाव येथे करण्यात आले त्या प्रसंगी शाळेतील ९  विद्यार्थ्यांना बक्षिसाच्या स्वरुपात शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून पेन्सिल चे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत आगलावे यांनी केले , त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास तायडे , सौ मीनाक्षी चौधरी मॅडम , सौ माधुरी वानखेडे मॅडम धर्मरथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक पाटील , श्री संतोष भिताडे , बाबू शेख , अकील पहेलवान , श्री तुषार सूर्यवंशी , आफिस खान , श्री निशांत पाटील , अकील पटेल , श्री महेश राठी , श्री महेश चौधरी इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button