आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा । २० जुलै २०२३। चोपडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पाऊसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. परंतु अजुनही तालुक्यातील शेतक-यांना जोरदार प्रतिक्षा आहे. तालुक्यातील पेरणीचे सर्व कामे पुर्ण झाली आहेत. आता शेतकरी राजा कोळपणी, निंदणी सारख्या कामांच्या प्रतिक्षेत आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोळपणीची कामे मात्र बंद असल्याचे चित्र पहायला मिळतंय.
चोपडा तालुक्यात बुधवार व गुरूवार या दोन्ही दिवस संततधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतकर्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु दुसरीकडे शेतात वाफ होत नसल्याने पिकांना कोळपणी सारखी कामे होत नसल्याने शेतातील मजुर मात्र कामाच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.
आत्माराम पाटील, प्रतिनिधी चोपडा मो. 9921700243