जळगाव

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पद्धती व बदलांवर उहापोह

तज्ञ डॉक्टर्सची उपस्थिती, चित्रफितीच्या माध्यमातून दिला कानमंत्र

टीम आवाज मराठी जळगाव | १५ जुलै २०२३ |  वैद्यकिय शिक्षण पध्दती व त्यातील बदलावर चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकत, विविध उदाहरण देत डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर व प्राध्यापकांसाठी आयोजित ‘बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (इउचए) या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेतून कानमंत्र देण्यात आला.


डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील डॉ.केतकी हॉल येथे गुरुवार दिनांक १३ जुलै ते १५ जुलैपर्यंत ‘बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ (इउचए) या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी एनएमसीचे निरीक्षक डॉ.झुबेरी हुसेन, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, एमईयूचे समन्वयक डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.कैलास वाघ, डॉ.राहूल भावसार, डॉ. अमृत महाजन, डॉ. शुभांगी घुले, डॉ. रंजना शिंगणे, डॉ. निलेश बेंडाळे, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. बापूराव बिटे, डॉ. दिलीप ढेकळे यांची उपस्थीती होती.याप्रसंगी डॉ.अनंत ेंडाळे यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांना नविन अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण प्रणालीचे प्रशिक्षण देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डायनॅमिक्सच्या संकल्पना समजून घेत, अध्यापन आणि अध्यापनात गट/संघांच्या कार्यामध्ये उपयोग, शिक्षणाच्या पदानुक्रमाची मूलभूत समज, लर्निंग डोमेन्स परिभाषित करणे, अध्यापन शिकण्याच्या प्रक्रियेत शिकण्याच्या तत्त्वांचा वापर करावा, ध्येय, भूमिका, क्षमता, एलओ परिभाषित करून एकमेकांमधील संंध स्पष्ट करा, सक्षमतेवर आधारित शिक्षणाची तत्त्वे विस्तृत करणे, आयएमओच्या संकल्पनेवर प्रकाश टाकून योग्यतेसाठी एलओज् डिझाइन करा, विविध शिकवण्याच्या शिक्षण पद्धती, टीएलएम२ गणना करा, मोठ्या गटामध्ये परस्परसंवादी शिक्षणाची तत्त्वे वापरा, माहिती प्रदात्यापासून ते सुविधाकर्त्यापर्यंत शिक्षकाची दलणारी भूमिका समजून घ्या, मूल्यमापनाची तत्त्वे आणि प्रकार आणि गुणधर्म विस्तृत करावे, मूल्यांकनाची उपयुक्तता स्पष्ट करावी, मॉड्युल डिझाइन करण्याच्या पायर्‍या समजतात, विद्यार्थ्यांना प्रभावी अभिप्राय प्रदान करते, अंतर्गत मूल्यांकन आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंटसाठी योजना विकसित करा, विविध संघांचा वापर करून संस्थेमध्ये एटकॉम कसे कार्यान्वित करावे हे समजते, क्षमतांचे शिक्षण आणि मूल्यांकन करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती लागू करा, एसडीएल ची संकल्पना आणि आचरण समजते, विद्यार्थ्यांमध्ये स्व-निर्देशित शिक्षण, एसडीएलला प्रोत्साहन द्या, कौशल्ये प्रभावीपणे शिकवा, कामाच्या ठिकाणी शिकवण्याची कौशल्ये, कौशल्य प्रयोगशाळेचा प्रभावीपणे वापर करा, विद्यार्थी डॉक्टर शिक्षण संकल्पना समजून घ्या, क्षमतांसह टीएलएम् संरेखित करणे समजते, विविध कौशल्यांसाठी योग्य शिक्षण पद्धती निवडा, ब्लू प्रिंटिंगची संकल्पना समजते, डिझाईन थिअरी आणि प्रॅक्टिकल/क्लिनिकल परीक्षा., लहान उत्तरे आणि तर्क प्रश्नांसह योग्य निंध प्रश्न लिहा., योग्य परिस्थिती आधारित एमसीक्यु लिहा., उद्दिष्टे आणि अध्यापन शिकण्याच्या पद्धतीला योग्य असा पाठ योजना विकसित करा, कौशल्यांचे प्रभावीपणे मूल्यांकन करा, कामाच्या ठिकाणी कौशल्यांचे मूल्यांकन करा, कौशल्यांमध्ये योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी कौशल्य प्रयोगशाळेचा वापर करा, कौशल्य मूल्यांकन स्टेशन डिझाइन करा, शिक्षणातील वाढीचे मार्ग समजून घ्या, एमईयुची भूमिका आणि एमईयुमध्ये प्राध्यापकांची भूमिका, पुढील अभ्यासक्रमांसाठी संधी, शिक्षणात नेटवर्किंग, दिलेल्या उद्दिष्ट/योग्यता आणि टीएलएम साठी योग्य मूल्यांकन पद्धत निवडा, मार्गदर्शनाची तत्त्वे समजून घ्या, ही तत्त्वे पदवी/ पदविका अभ्यासक्रमात लागू करा, शैक्षणिक वर्षासाठी वेळापत्रक तयार करण्याच्या पायर्‍या समजून घ्या अशा विविध मुद्यांवर दर दिवशी तिन सत्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ.नारायण सदाशिव आर्वीकर, डॉ.झुबेरी हुसेन, डॉ.अमृत महाजन, डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. कैलास वाघ, डॉ. सी.डी. सारंग, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. राहुल भावसार, डॉ. रंजना शिंगणे, डॉ. शुभांगी घुले, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ. बापूराव बिटे, डॉ.अनुश्री बजाज यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button