जळगावराजकीयराज्य

प्रहारच्या जळगाव महानगर सरचिटणीसपदी जतिन पड्यां यांची नियुक्ती

प्रहार जनशक्ती पक्षाची जळगाव महानगर कार्यकारणी व आघाडी प्रमुखांची यादी जाहीर

टीम आवाज मराठी जळगाव | १४ जुलै २०२३ | प्रहार संघटनेची जळगाव महानगर कार्यकारिणी जाहीर झाली असून आघाडी प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चु कडु यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या आदेशाने जळगाव शहर महानगर अध्यक्ष, महानगर कार्यकारणी, आघाडी प्रमुख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात अध्यक्षपदी प्रविण पाटील, उपाध्यक्षपदी किशोर सैंदाणे, पंकज पवार, सरचिटणीसपदी जतिन पड्यां व विजय पाटील यांची वर्णी लागली आहे.

त्याचप्रमाणे, चिटणीसपदी कल्पेश सपकाळे, रोहित कोठावदे, जितेंद्र वाणी, तर सदस्यपदी निलेश बोरा, गुणवंत देशमुख, राज पाटील, केतन झवर, धनंजय आढाव यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सहाय्यता महानगर प्रमुख पदी नरेंद्र सपकाळे, दिव्यांग आघाडी महानगर प्रमुख नितीन सुर्यंवंशी, शिक्षक आघाडी महानगर प्रमुख शैलेंद्र बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त झालेल्या पदाधिका-यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. 

सध्या प्रहार संघटनेने ला कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी विविध ठिकाणी प्रहार संघटनेची कार्यकारिणी जाहीर होत असतानाच जळगाव महानगरची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे.  बच्चू कडू त्यांच्या सूचनेवरून पक्षातील पदाधिकारी पक्ष बळकटीसाठी पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागलेले आहेत.

प्रहार संघटना जळगाव जिल्ह्यामध्ये कशी वाढवण्यात येईल. संघटने सोबत कार्यकर्ते कसे जोडता येईल. तळागाळातील माणसांपर्यंत सामान्य माणसापर्यंत प्रहार संघटनेचे ध्येय धोरणे उद्दिष्टे कसे पोहोचवता येतील या साठी नवीन कार्यकारणी काम करणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button