जळगाव

शनिवार पर्यंत ८०० पैकी १०० दाखले देणार..प्रांताधिकाऱ्यांचे अभिवचन..

अन्यथा सोमवार पासून पुन्हा आंदोलन करणार......... जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ती.

टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी  | दि १५ ऑगस्ट २०२३ | चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना अनुसूचित जमातीचे टोकरेकोळी (एसटी) चे दाखले सुलभ पध्दतीने मिळावीत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी ९ ऑगस्ट पासून प्रांत कार्यालयासमोर शेकडों समाज बांधवांना सोबत घेऊन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, मुक मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केलेले होते. सत्याग्रहाच्या सहाव्या दिवशी प्रांताधिकारी यांनी १२ दाखले देण्याचे कबुल करून शनिवार पर्यंत प्रलंबित ८०० पैकी १०० दाखले देणार, असे अभिवचन दिले आहे. म्हणून तूर्तास अन्नत्याग सत्याग्रह स्थगित करण्यात आला आहे. तसे न झाल्यास पुन्हा सोमवार पासून कोळी समाजातर्फे तीव्र लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन, रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, अशीही स्पष्टोक्ती अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर यांनी यावेळी केलेली आहे.

याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरूणलाल गुजराथी, चोसाकाचे माजी चेअरमन घन:शाम पाटिल, व्हा.चेअरमन शशीभाऊ देवरे, माजी जि.प.सदस्य शांताराम सपकाळे, जेष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर, प.स.चे माजी सभापती डि.पी.साळुंकेसर, उपसभापती गोपाळराव सोनवणे, सदस्य भरत बाविस्कर, नगरसेवक कैलास सोनवणे, सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर, भाजपाचे नेते मगन बाविस्कर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटिल, बीआरएसच्या जिल्हा महिला समन्वयक सौ.कोमलताई पाटिल, धुळे जिल्हा समन्वयक एडव्होकेट अविनाश पाटिल, तालुकाध्यक्ष दिपक पाटिल, गोरगावलेच्या माजी सरपंच सौ.आशाबाई बाविस्कर, व्यापारी महामंडळाचे संचालक वैभवराज बाविस्कर, प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस अधिकारी रावलेसाहेब, पी.आय. के.के.पाटिल, गोपनियचे विलेश सोनवणे, सामा.पदाधिकारी आर.एल.बाविस्कसर, भाईदास बाविस्कर, भरतराव पाटिल, बाळुभाऊ कोळी, प्रेमनाथ बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, पंकज रायसिंग, विशालराज बाविस्कर, यांचेसह आदिवासी कोळी जमातीचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाईट:- जगन्नाथ बाविस्कर, अन्नत्याग सत्याग्रह चे प्रमुख.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button