देश-विदेश

ऑनलाइन कर्जाच्या विळख्यात फसल्याने; पती-पत्नीं ने मुलाबाळांसह विष पिऊन आत्महत्या

भोपाळमधील ऑनलाइन ऍपच्या विळख्यात अडकलेल्या परिवारांसह आत्महत्या

टीम आवाज मराठी टीम | १३ जुलै २०२३ |  मध्यप्रदेशातील भोपाळमधील ऑनलाइन ऍपच्या विळख्यात अडकलेल्या पती-पत्नी ने आपल्या दोन निष्पाप मुलांना विष पाजून आणि नंतर स्वतः दोघांनी आत्महत्या केली दि १३ जुलै २०२३ रोजी गुरुवारी सकाळी या जोडप्याचे मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. दोन्ही मुलांना विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांना घटनास्थळी आत्महत्येची चिठ्ठीही निदर्शनास आली आहे.

रतीबाद येथील शिव-विहार कॉलनी मधील रहिवासी भूपेंद्र विश्वकर्मा वय ३८ हा कोलंबिया येथील एका कंपनीत ऑनलाइन नोकरी करायचा. भूपेंद्र यांच्यावर कामाचा तणाव असल्याने त्यांच्या वर कर्ज होते. कंपनीने त्याचा लॅपटॉप हॅक करून त्यात सापडलेल्या विविध संपर्कांवर संपादित केलेले अश्लील व्हिडिओ प्रसारित केले. त्यामुळे भूपेंद्रने पत्नी रितू वय ३५ हिच्यासह आत्महत्या केली. दोघांनी सर्वप्रथम ऋतुराज वय ३ आणि ऋषिराज वय ९ या दोन्ही मुलांना विष पाजण्यात आले होते. सदरील प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पाच सदस्यीय एसआयटीमध्ये अतिरिक्त डीसीपी झोन-१, एसीपी टीटी नगर, टीआय रतीबाध, ​​टीआय टीटी नगर आणि सायबर क्राईम पथकातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भूपेंद्रचा मोठा भाऊ नरेंद्र विश्वकर्मा यांनी सांगितले की, त्याने रात्री उशिरा परिवार समवेत सेल्फी काढला होता. थंड पेय मध्ये सल्फा मिसळून दोन्ही मुलांना पाजले. यानंतर भूपेंद्र त्याच्या पत्नीसह मुलांजवळ थोडे बसले. दोन्ही मुलांचा मृत्यू पावल्याची खात्री झाल्यावर भूपेंद्रने दोन दुपट्टे एकत्र बांधून फासावर लटकवून घेतले. व्हाट्स अपवर सकाळी ४ वाजता भाचीला आत्महत्येची चिठ्ठी पाठवली  भूपेंद्र विश्वकर्मा यांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता त्यांची भाची रिंकी विश्वकर्मा हिला व्हाट्स अपवर आत्महत्येची चिठ्ठी पाठवली होती. तसेच पत्नी आणि दोन्ही मुलांसमवेत सेल्फी पाठवला.या फोटोला कॅप्शन लिहिले कि हा माझा शेवटचा फोटो आहे. आज नंतर आपण एकमेकांना भेटणार नाही. सकाळी सहा वाजता रिंकी यांनी सदर फोटो आणि आत्महत्येची चिठ्ठी बघून हि माहिती कुटुंबीयांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button