देश-विदेश

शिवरायांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुभेदार’ चित्रपटाची तुफान चर्चा

टीझरला देखील मिळतोय चांगला प्रतिसाद

टीम आवाज, मराठी जळगाव । २१ जून २०२३ ।  शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटांना सध्या प्रक्षकांची चागलीच पसंती मिळत आहे. देशात अनेक विषयांवर आधारीत चित्रपट प्रदर्शित होत असले तरी शिवरायांच्या इतिहासातील अनेक पुरावे देत निर्मित होत असलेल्या चित्रपटांची देखील दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. अशातच येऊ घातलेल्या सुभेदार या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 25 ऑगस्ट 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या महिन्यात या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला होता.  प्रेक्षकांकडूनही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केलीये. गेल्या काही वर्षात रिलीज झालेले फर्जंद, पावनखिंड, फत्तेशिकस्त, शेर शिवराज या शिवराज अष्टक चित्रपट मालिकेतील सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात असेल. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. अभिनेता अजय देवगणने तान्हाजीची प्रमुख भुमिका साकारली होती. दरम्यान, सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कथामकावर तेवढीच टीका करण्यात आली. मात्र आता तान्हाजी चित्रपटाला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार गड आला पण.’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

“आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं” म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजी मालुसरे यांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजी म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद… त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button