टीम आवाज मराठी, मुंबई | १३ जुलै २०२३ | सध्या महाराष्ट्रतील राजकारणात मोठ्या घडामोडी होत असून त्यात मंत्र्यांच्या खाते वाटपावरुन शिंदे-फडणवीस आणि अजित पवार त्रिशंकू गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर आता दुसरीकडील शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये खोटी माहिती नमूद केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत मोठी वाढ निर्माण झाली आहे. सदर माहिती सिल्लोड न्यायालयाच्या तपासातून समोर आली आहे या प्रकरणामुळे अब्दुल सत्तार यांची आमदारकीच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण होऊ शकते.
२०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे पोलीस तपासातून निदर्शनास आले आहे. २०१४ ला खरेदी केलेल्या जमिनीच्या किमतीमध्ये २०१९ ला अधिक किंमत दाखवण्यात आली आहे. अशाच 4 ते 5 मालमत्तासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीमध्ये फरक असल्याचे न्यायालयीन तपासात निष्पन्न झाले आहे. सिल्लोड न्यायालयाकडून आता या प्रकरणावर खटला चालवण्याचे आदेश देण्यात आले असून सत्तारांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते.