टीम आवाज मराठी, भुसावळ दि. 03 ऑक्टोबर 2024 – लग्नाचे खोटे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीला शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एका विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरामध्ये एका परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरूणी ही आपल्या राहायला असून तिची शुभम शैलेश कोळी रा. थोरगव्हाण ता.रावेर जि.जळगाव याच्याशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शुभमने तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला.
त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तरूणीने एक ऑक्टोबर रोजी रात्री संशयित आरोपी शुभम शैलश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ हे करीत आहे.