टीम आवाज मराठी, पुणे | दिनांक ८ सप्टेंबर २०२३ | उच्य व तांत्रिक शिक्षण मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे महाळुगे, बालेवाडी क्रीडा नगरी मध्ये भव्य आमदार चषक राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्य स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर व मुंबई जिल्ह्याचे वर्चस्व राहिले.
बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या मान्यतेने फायटर्स तायक्वांदो अकॅडमी, पुणे आयोजित ३३ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा अतिशय उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमधून ७५० हून अधिक खेळाडूंनी क्योरोगी व पूमसे या दोन प्रकारात स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुलांमध्ये कृष्णा डोलारकर ( परभणी) व मुलींमध्ये राधिका भोसले (ठाणे) हे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले. “ क्योरोगी“ प्रकारामध्ये ठाणे जिल्ह्याने सर्वाधिक पदकांसह प्रथम क्रमांक मिळवला असून पुणे जिल्हा द्वितीय तर कोल्हापूर तिसऱ्या स्थानावर राहिला. ” पूमसे“ प्रकारात रत्नागिरी, ठाणे व पालघर संघाचे वर्चस्व राहिले. एकमेव अधिकृत असलेल्या तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुंबई या राज्य संघटनेच्या खेळाडुंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून आडकाठी आणली आहे. पात्र खेळाडूंना हक्काच्या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अश्या वागणुकीमुळे प्रतिभावान खेळाडुंचे टॅलेंट वाया जाईल. या गोष्टीला वेळीच आवर घाला, अशी मागणी करत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ॲड आर डी मंगुयेशकर यांनी महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका अशी साद घातली आहे. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. उच्च व तंञ शिक्षणमंञी चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून या ‘आमदार चषका’चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले. छतीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रदर्शन चांगले होईल असेही ते म्हणाले.
शिवछञपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रविण बोरसे यांच्या फायटर्स अकॅडेमी कडून आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडुंचा सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. “ ताम “ तायक्वांदो संघटनेकडून खेळातील उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार २०२३ ने अमोल तोडनकर ( क्योरोगी ) व रॅाबीन वॉल्टर (पूमसे ) यांना तर गुणवंत वरिष्ठ संघ प्रशिक्षक म्हणून प्रविण सोंकुल यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार २०२३ साठी अभिजित खोपडे, निशिता कोतवाल ( क्योरोगी ) व वंश ठाकूर, मृणाली हार्नेकर (पूमसे ) यांना पुरस्काराने सन्मानित केले तर तायक्वांदो खेळातील सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो संघटनेचा राज्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या स्पर्धा दि १८, १९ व २० जानेवारी २०२४ दरम्यान पुणे येथे पार पडली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री. राजेश पांडे यांनी पुणे विद्यापीठामध्ये हा खेळ समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन दिले व आयोजकांना तशी पूर्तता करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी व्यासपीठावर दक्षिण कोथरूड मंडलाचे अध्यक्ष डॅा. संदिप बुटाला, उत्तम अध्यक्ष मंडलाचे मा. श्री. सचिन पाषाणकर, मंडल सरचिटणीस व स्पर्धा प्रमुख प्रा.अनुराधा येडके, ओबीसी आघाडी अध्यक्ष राज तांबोळी, मा. नगरसेवक श्री.दिलीप वेडे पाटील, वृक्षालीताई चौधरी, श्री. दत्ताभाऊ चौधरी, श्री. लहू बालवडकर, श्री. हेमंत बोरकर, तायक्वांदो फेडरेशनचे सहसचिव मा. श्री.मिलिंद पठारे, तायक्वांदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्री. अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री. धुलिचंद मेश्राम, श्री. प्रविण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सहसचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री. व्यंकटेश कर्रा, सदस्य श्री. अजित घारगे, श्री. निरज बोरसे, सहयोगी पदाधिकारी श्री.राजेश महाजन, श्री.भालचंद्र कुलकर्णी, श्री. विनायक ऐनापुरे, श्री. विजय कांबळे आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. भगतसिंग वेलानी व आयोजन समितीचे सचिव श्री.विवेक कोळी यांची उपस्थिती लाभली. समालोचन सौ प्राजक्ता मांडके यांनी केले तर डॉ. अविनाश बारगजे यांनी आभार मानले.
तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका – ऍड. मंगूयेशकर
तायक्वांदो खेळात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. तायक्वांदो खेळातील सर्वच स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. ही गुणवता खेळातील आलेल्या एमओए च्या राजकारणामुळे वाया जाईल कि काय अशी भिती आहे. महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका, अशी साद तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव ऍड. आर डी मंगूयेशकर यांनी ३३ वी महाराष्ट्र राज्य सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी राज्य सरकार ला घातली आहे.
जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी
एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात 346 धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 189 धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद 101 धावांची खेळी केली. जळगाव संघातर्फे धवल हेमनानी याने ४७/४, कर्णधार जगदीश झोपे याने ३९/३ ऋषभ कारवा याने १३/२ तसेच नीरज जोशी याने ८/१ जळगाव संघातर्फे बळी मिळविले.
जळगाव संघाने वाय एम सी ए संघावर १५९ धावांची आघाडी घेतली व फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी पाचारण केले.
दुसऱ्या डावातही वाय एम सी ए संघ डळमळला व खेळ संपण्याच्या वेळेपर्यंत 31 षटकात सहा गडी गमावित केवळ 61 धावा केल्या. त्यांच्यातर्फे निशांत नगरकर याने 22 धावा केल्या तर जळगाव संघातर्फे रिषभ कारवा याने तीन बळी मिळविले. नचिकेत ठाकूर व पार्थ देवकर यांनी प्रत्येकी एक एक बळी टिपला.
हा दोन दिवसीय कसोटी सामना अनिर्णीत राहिला परंतु जळगाव संघाला पहिल्या डावातील आघाडीमुळे महत्त्वपूर्ण तीन गुण प्राप्त झाले.
जळगाव संघाचे अभिनंदन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.