जळगाव

लम्पीच्या प्रभावामुळे बैल पोळा गोठ्यातच साजरा करा

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांचे सर्व पशू पालकांना आवाहन

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक १३ सप्टेंबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील सर्व गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथी रोगांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बैल पोळा हा सण उद्या सर्व स्तरांवर साजरा केला जाणारा सर्व पशुपालकांनी सार्वजनिक पद्धतीने मिरवणूक काढून साजरा न करता सदरहू आपल्या बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.

पशुसंवर्धन विभागातर्फे लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सध्याच्या परिस्थितीत  जिल्ह्यात लम्पीमुळे बैलांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा हा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलांचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून सुरक्षित रहावे, तसेच आजारांची  लक्षणे होवू नये यासाठी सर्व पशुपालकांनी पोळा हा सण सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता आपल्या बैलांची पुजा गोठयातच करून साजरा करावा. जनावरांमध्ये लम्पीची सदृश लक्षणे दिसल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लम्पी स्किन आजार जरी संसर्गजन्य असला तरी रोगाचे लवकर निदान झाल्यास व योग्य उपचार त्वरीत सुरू केल्यास हा आजार ८ ते १० दिवसात बरा होतो. सध्याच्या परिस्थितीत जळगाव जिल्हयात उपचाराअंती आजार बरा होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी न घाबरता शासकीय यंत्रणे मार्फत उपचार करून घ्यावे. त्यासोबत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने गोठा स्वच्छता व गोचिड निर्मूलन करून घ्यावे.असे आवाहन ही पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button