जळगाव

अमळनेर स्टेशनवरील रेल्वेतून पडल्याने उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यु

ओळख पटविण्याचे आवाहन अमळनेर रेल्वे पोलिसांनी केले आहे.

टीम आवाज मराठी, अमळनेर | दिनांक ६ सप्टेंबर २०२३  :  अमळनेर रेल्वे स्टेशनवर एका अनोळखी तरूणाचा रेल्वेतून पडून जखमी होऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

जी.आर.पी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर रेल्वे स्टेशनवर २९/०८/२३ रोजी रात्री ११:०० वाजता मेमो एक्सप्रेस मधून एका तरुण पडल्याने जखमी झाला असता घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तपासणी केली असता सदरील तरुण अनोळखी असल्याचे समजले त्याबाबत जखमी तरुणाला वैद्यकीय उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता त्या अनोळखी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन ओळख पटविण्याचे आवाहन अमळनेर रेल्वे  पोलिसांनी केले आहे.  मृत व्यक्तीचे वर्णने – अंदाजीत वय २५ ते ३० वर्ष, रंग गोरा, उंची ५×५, केस काळे, बारीक दाढी- मिशा, हातांवर चार ठिकाणीं गोंधलेले आहे तसेच अंगावर पांढरा शर्ट काळ्या रंगाचे फुले व काळी जिन्स असे वर्णन असून याबाबत ९९२३०५०८३१ या नंबरवर संपर्क साधावा.  पुढील घटनेचा तपास पोलिस हवालदार अलका अढाळे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button