नंदुरबार
दोघात दुसरी नव्हे तर तिसरी बायको करून पोलीस निरीक्षकावंर गुन्हा दाखल
नंदुरबार पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांचा कारनामा
टीम आवाज मराठी, नंदुरबार | ०६ जुलै २०२३ | दोन बायका असताना तिसरी बायको करणाऱ्या पोलीस निरीक्षक विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक नितीन सुखदेव चव्हाण राहणार दोंडाईचा असे दाखल करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पहिली पत्नीला फारकत देण्याचे आमिष देऊन तळोदा येथील एका २८ वर्षीय महिलेशी सम्बन्ध ठेऊन तिच्याशी मार्च २०१९ मध्ये लग्न करण्यात आले व तिच्यात[असून एक कन्येला जन्म दिला आहे सदर महिलेस तळोदा येथे खोली करून दिली आहे. आणि पुन्हा आता तिसऱ्या महिलेशी संबंध ठेऊन लग्न करून तळोदा येथे ठेवण्यात आलेल्या पत्नीला शिवीगाळ करून हाकलून लावण्यात फसवणुकीचा आरोप केला आहे. पीडितेने जवळच्या पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.