टीम आवाज मराठी जळगाव-दि. ७ – जळगाव दि. ७ प्रतिनिधी – चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात “गुढीपाडवा”. मराठी नवीन वर्षाचा आरंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. या ऋतूचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजनाने भाऊंच्या उद्यानात संपन्न झाला. जळगावच्या गुणी कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटन म्हणून विकास तळेले (डेप्युटी रजिस्टर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) तसेच डॉ. मधुलिका सोनवणे (डायरेक्टर, विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले. नववर्षाच्या स्वागतच सुरेल प्रवासाच्या या कार्यक्रमात श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, वरूण नेवे, अथर्व मुंडले तर साथसंगत केली प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) आणि निरूपण केले होते अनघा गोडबोले हे कलावंत सहभागी होते. कलावंतांचे सत्कार डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर यांनी केले.
सांज पाडव्यात ही गाणी सादर झाली
तराणा आदीदेव महादेव राग यमन याने सुरवात झाली. यानंतर अनंता तुला कोण पाहू शके, त्या फुलांच्या गंधकोशी, पांडुरंग कांती, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, रुणुझुणू रुणुझुणू, तू सुखकर्ता, राम चंद्र कृपाळू, हे सुरांनो चंद्र व्हा, नारायणा रमा रमणा, विश्वाचा विश्राम रे, मन मंदिरा, दिल की तापीश, मी राधिका, बाजे मुरलीया,भैरवी अवघा रंग एक झाला यानंतर धन्य भाग सेवा का याने उत्तरोत्तर रंगलेल्या सांज पाडवा मैफिलीचा समारोप झाला.