
टीम आवाज मराठी, यावल दि. 03 ऑक्टोबर 2024 – तालुक्यातील मोहराळा गावात माहेरी राहत असलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेने बुधवारी सायंकाळी गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. सीमरन आकिब तडवी (20, रा.लोणी पंचक, ता.चोपडा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सीमरण ही ववाहित तरुणी आपल्या माहेरी आई-वडिलांकडे गेल्या काही महिन्यांपासून आली होती. बुधवारी सायंकाळी तिचे आई आणि वडील हे यावल शहरात आले असता तरुणीने आपल्या घरी फवारणीच्या पंपाला बांधलेली पट्टीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजता निदर्शनास आला. तातडीने तिला यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राजू तडवी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.
घटनेची माहिती मिळताच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष लहू रामभाऊ पाटील हे दाखल झाले होते. त्यांनी मयत तरुणीच्या कुटुंबाला धीर दिला. या तरुणीने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.