एरंडोल तालुक्यात बारा तासाचा रिमझिम पाऊस
उमेश महाजन आवाज मराठी, एरंडोल | १६ सप्टेंबर २०२३ |एरंडोल सह तालुक्यात शुक्रवारी रात्री बारा वाजेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली रात्रभर पावसाचे रिप रिप सुरू होती सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाने पिच्छा सोडला नाही या बारा तासाच्या रिमझिम पावसामुळे सर्वत्र पाण्याची डबकी तयार झाली आहे तर शेतामध्ये पिकांमध्ये पाणी साचले आहे
एकंदरीत सदरचा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती शेतकऱ्यांच्या गोटातून सांगण्यात आली मात्र पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे काही पिकांचे नुकसान झाले आहे विशेष करून कपाशीची पिके लाल पडले आहेत तर कपाशीच्या कैऱ्या खाली पडत आहेत शेतात पाणी साचल्यामुळे इतर पिकांचे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात अजूनही रिमझिम पाऊस सुरू आहे शेतातून पावसाचे पाणी वाहून निघेल असा पाऊस एकदाही झाला नाही पावसाळा संपत आला तरीसुद्धा नद्या नाल्यांना एकही पूर आला नाही. तसेच विहिरींची पाणी पातळी सुद्धा अद्याप वाढली नाही.