जळगाव

नोकरीचे आमिष दाखवून आठ लाखात फसवणूक

भुसावळ पोलिसांनी संशयित महिलेस नाशिकहून केली अटक

टीम आवाज मराठी, जळगाव। २४ जून २०२३ ।  भुसावळ शहरातील फालक परिसरात वास्तव्यास राहत असलेले रहिवासी शशिकांत रघुनाथ मेढे यांना नोकरी लावून देतो अश्या प्रकारचे आमिष दाखवून ८ लाख रुपयांत फसवणूक करणाऱ्या महिलेस बाजारपेठ पोलीस पथकाने नाशिक येथून संशयित आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. Fraud Woman arrested from Nashik

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संशयित कल्पना संजय सोनवणे ह्या महिलेने शशिकांत रघुनाथ मेढे यांच्याकडून नोकरी लावून देण्यासाठी आमिष दाखवून त्यांच्या राहत्या घरी तसेच बँकेत ८ लाख रुपयांची मागणी करून फसवणूक केली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात १९ जून २०२३ ला दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी पोलिस कर्मचारी विजय नेरकर व सचिन चौधरी तसेच महिला पोलिस वैशाली सोनवणे यांना नाशिक येथे रवाना केले. त्या अनुषंगाने पथकाने महिलेचा कसून शोध घेऊन नाशिक येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button