जळगाव

राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

रत्नागिरी येथे होणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत सहा खेळाडूंचा होणार सहभाग

टीम आवाज मराठी, जळगाव। ११ जून २०२३ । जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हापेठ व्यायामशाळा येथे १७ वर्षाआतील मुले व मुलींच्या जिल्हास्तर निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. निवड चाचणीमध्ये रावेर, पाचोरा, शेंदुर्णी, जळगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड झाली. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.


निवड झालेले खेळाडू
मुलांच्या गटात – (४५ किलो आतील) दानिश तडवी जळगाव, (४८ किलो आतील) भावेश चौधरी, शेंदुर्णी, (५१ किलो आतील) प्रबुद्ध तायडे रावेर, (५५ किलो आतील) जय गुजर शेंदूर्णी, (५९ किलो आतील) लोकेश महाजन रावेर, (६३ किलो आतील) दिनेश चौधरी रावेर, (६८ किलो आतील) जयेश पवार जळगांव, (७३ किलो आतील) यश जाधव रावेर, (७८ किलो वरील) रूतीक कोतकर जळगांव

मुलींमध्ये : – (४२ किलो आतील) सिमरन बोरसे जळगांव, (४६ किलो आतील) रूतूजा पाटील पाचोरा, (४९ किलो आतील) जीवनी बागुल पाचोरा, (५२ किलो आतील) नियती गंभीर जळगांव, (५५ किलो आतील) निकीता पवार जळगांव, (५९ किलो आतील) रूतिका खरे पाचोरा इत्यादींंची निवड झाली आहे. प्रथम विजेते खेळाडूंची रत्नागिरी येथे दि. २४ ते २६ जून २०२३ दरम्यान ३३ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. पंच म्हणून अंकीता पाटील, विशाल बेलदार, पुष्पक महाजन, निलेश पाटील, श्रेयांग खेकारे आदींनी परिश्रम घेतले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बाविस्कर (जळगाव), जीवन महाजन, जयेश कासार (रावेर ), सुनील मोरे (पाचोरा), श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल (शेंदूर्णी ) यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button