जळगाव
चोपडा येथील वनक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट स्वांतत्र्य दिन ध्वजारोहण
सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या हस्ते ध्वजारोहण
टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी | दि १५ ऑगस्ट २०२३ | आज सर्वत्र १५ ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाच्या निमित्ताने येथील चोपडा येथील वनक्षेत्र कार्यालयाच्या प्रांगणात सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी चोपडा वन क्षेत्रपाल बी. के. थोरात, सामाजिक वन क्षेत्रपाल अतिरिक्त कार्यभार तुषार देवरे, वनपाल विपुल पाटील (वाघझिरा), तसेच वन क्षेत्रातील वनपाल, वनरक्षक, वन मजूर, वाहन चालक, वन सेवक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ध्वजारोहणच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी साठी चोपडा आगार रक्षक किरण पाटील यांनी परिश्रम घेतले.