जळगाव

वेळोदे येथील भोई समाजातील गरीब कुटुंबास आर्थिक हातभार

दुध संघ संचालक भाजप नेते रोहीत निकम यांनी एक लाख रूपये मदतीचा हात

टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी | दि ११ ऑगस्ट २०२३ | येथील चोपडा तालुक्यातील मौजे वेळोदे येथील गरीब भोई समाजाचे कुटुंबातील स्वर्गीय अमोल भोई यांच्या घरी जाऊन सात्वंनपर भेट घेतली व परिस्थितीची विचारणा केली असता त्याच्या आईवडीलांना आर्थिक मदतीचा आधार म्हणून दुध संघ संचालक भाजप नेते रोहीत निकम यांनी एक लाख रूपये मदतीचा हात दिला. भोई समाजातील गरीब कुटुंबातील करता करविता शालेय विद्यार्थी वन विभागाची परिक्षा हाॅल तिकिट घेण्यासाठी जात असता काळाने झडप घातली व अमोल भाऊ आपल्यातुन कायमचे निघुन निघुन गेले.

स्वर्गीय अमोल यांचे सात्वंन करण्यासाठी दुध संघ संचालक रोहीत निकम. भाजपा तालुका अध्यक्ष पंकज पाटील. चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे.जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन. चिटणीस भरत सोनगिरे.चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button