प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांचे वडिलांचे धुळे जिल्हा रूग्णालयात मृत्यू
धुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते
आत्माराम पाटील | आवाज मराठी चोपडा | दिनांक ४ सप्टेंबर २०२३ येथील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे येथील राहणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या वडिलांचे धुळे जिल्हा रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची खात्री लायक वृत आवाज मराठी चे चोपडा चे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांच्या हाती लागले आहे
सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे येथील रहिवासी महाराष्ट्रातील लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील रविंद्र पाटील हे आठ दिवसापूर्वी त्यांच्या बहिणी कडे जातो. असे गावकर्यांना सांगितले होते. परंतु रविंद्र पाटील हे बहिणी कडे न जाता धुळे येथे एका ठिकाणी बेवारस अवस्थेत तेथील सामाजिक कार्यकर्ते यांना दिसले त्यांनी लगेच धुळे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार साठी दाखल केले असता त्यांची आज प्राणज्योत दिनांक ४ सप्टेंबर रोजी साडे तीन वाजता मावळली. उद्या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे माहिती माजी सरपंच संजय बोरसे यांनी आमच्या प्रतिनिधी आत्माराम पाटील यांच्या शी भ्रमणध्वनी द्वारे दिली.