राज्य

संभाजी भिडेना विधान महागात पडले ; पोलिसात गुन्हा दाखल !

देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल असे निंदाजनक विधान केल्यामुळे राज्यभरात पडसाद

टीम आवाज मराठी अमरावती | २९ जुलै २०२३ | अमरावती येथील एका कार्यक्रममध्ये, “गांधीजींचे वडील हे मुस्लिम जमीनदार होते”, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांनी केले होते. ​​​​​​भिडेंच्या अश्या वादग्रस्त विधानाने राज्यभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ​देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल असे निंदाजनक विधाने केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी गुरुजी यांना त्वरित अटक करावी, अशी मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय निंदाजनक विधान केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांच्याविरोधात अमरावतीमध्ये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवार रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती.
महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक विधान प्रकरणी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करताना नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या विधानामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत पोलिसांनी आपल्याकडे पुरावेही मागितल्याचे कुयटे यांनी सांगितले आहे. संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांनी जे वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. बेताल विधान करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button