जळगाव

देशी बनावट बाटल्यांची वाहतूक; राज्य उत्पादन विभागाची कारवाई

पथकाने धडक कारवाईत 5 लाख 51 हजार 700 रूपये मुद्देमालसह जप्त

टीम आवाज मराठी पाचोरा | २० जुलै २०२३ | पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने धडक कारवाई करून 5 लाख 51 हजार 700 रूपयाच्या मुद्देमालसह जप्त करण्यात आला आहे त्यानुसार संशयित तीन आरोपींवर अटकेची कारवाई करून राज्य राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागास गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने दि. 19 बुधवार रोजी दुपारी पाचोरा  तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रोडवर त्यांनी सापळा रचण्यात आला तिथे बनावट देशी दारू वाहतूक करत असताना संशयित आरोपी अविनाश संतोष जाधव वय 24 रा. हिंगणे ता. जामनेर आणि त्या सोबत रेहान रमजान मणियार वय 20 रा. नेरी दिगर ता. जामनेर यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून बनावट देशी दारू टेंगो पंचच्या 180 मिलि लीटर असलेल्या 984 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या याबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यानी घेतली असता, बनावट  मद्य पुरविणारा महेंद्र श्यामलाल राजपूत रा. तळेगाव ता. जामनेर यांस सुद्धा संध्याकाळ पर्यन्त अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली चार चाकी वाहन एम एच 27 बी झेड 5706 हि गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे एकूण 5 लाख 51 हजार 700 रूपयाच्या मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला असून तिन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई हि अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, गोकुळ कंखरे, रघुनाथ सोनवणे, प्रतिकेश भामरे, मनोज मोहिते, विठ्ठल हटकर, यांनी केली आहे सदर कारवाईसाठी चाळीसगांवचे आर. जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश पाटील, गिरीश पाटील, यांची मदत झाली सदरहू प्रकरणाचा तपास वाय. वाय. सूर्यवंशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button