वैशाली सुर्यवंशी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहिर पाठिंबा…
पाचोरा, प्रतिनिधी :- पाचोरा मतदार संघाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांना स्थानिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह जाहिर पाठिंबा दिला आहे.
पाचोरा – भडगाव मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असुन यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांनी आघाडी घेतली असून विविध विविध सामाजिक संघटनांचा वैशाली सुर्यवंशी यांना पाठिंबा मिळत आहे. त्यातच अधिक भर म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी देखील वैशाली सुर्यवंशी यांना आपला जाहिर पाठिंबा दिला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) जिल्हाध्यक्ष आनंद खरात, विभागीय अध्यक्ष भालचंद्र ब्राम्हणे, तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस गौतम निकम, तालुका सचिव सतिष सोनवणे यांच्या सह्यानिशी वैशाली सुर्यवंशी यांना पाठिंबा जाहीर केला आहे