
जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी) – शहरातील विनोबा नगर, शिरसोली रोड येथील रहिवासी श्रीमती उज्वला दिनकर पाठक (वय ८०) यांचे दि. ११ ऑक्टोबर ला पहाटे २ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंतिम संस्कार मेहरून स्मशानभूमि येथे झाला. त्या पाळधी येथील ग्रामसेवक दीपक पाठक यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.