मनपा प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण निलंबित
मनपाच्या टी.बी. सॅनोटिरीयम हॉस्पिटलची रद्दी परस्पर विकल्याप्रकरणी प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांचे निलंबन

टीम आवाज मराठी, जळगाव | ०७ जुलै २०२३ | जळगाव शहर महानगरपालिकेच्या टी.बी. सॅनोटिरीयम हॉस्पिटलची रद्दी परस्पर विकल्याप्रकरणी प्रभाग तीन प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आवाज इंडियाच्या प्रतिनिधींना दिली.
महानगरपालिकेच्या मेहरूण मधील टी. बी. हॉस्पिटल आवारात महापालिका प्रभाग तीनचे कार्यालय आहे. या ठिकाणी असलेली तब्बल तीन टन रद्दी नुकतीच विकण्यात आली. महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे रद्दी विकण्यासाठी निविदा काढावी लागते.पण सदरहू या अधिकाऱ्यांनी मात्र, कोणतीही निविदा न काढता, तसेच वरिष्ठांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता परस्पर रद्दी विकल्याचा ठपका बाळासाहेब चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
याप्रकरणाची जोवर चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रभाग अधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.