क्रीडाजळगाव

अनिर्बन रॉय व मैत्रेयी रॉय (बासरी व शास्त्रीय गायन जुगलबंदी)

जळगांव : –खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी, पी एन जी सन्स लि. प्रायोजित २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे.

मेहेर घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे पंडित लोकनाथ रॉय यांचा मुलगा अनिर्बन हा अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकार आहे ११ जानेवारी २०१० रोजी अनीर्बन चा जन्म या सांगितिक घराण्यात झाला. त्याची बहीण मैत्रेयी हीचा जन्म याच घराण्यात २ डिसेंबर २००३ रोजी झाला. शास्त्रीय गायन व बासरी वादन या दोन्ही कलांमुळे त्यांची ख्याती संपूर्ण भारतभर झाली. वयाच्या ५ व्या वर्षी “कल के कलाकार” च्या माध्यमातून अनिर्बान ने पहिला जाहीर कार्यक्रम केला. पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांच्याकडेही त्याने आपली सांगितली धडे गिरवले. त्यानंतर भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात अनिर्बनला बोलवण्यात आले होते.

सुरेश वाडकर यांच्या आकादमी तर्फे मास्टर मोहन अवॉर्ड, नादब्रह्म अवॉर्ड ने सन्मानित झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी शिष्यवृत्ती त्याला मिळाली. त्याचवेळी अनिर्बन हा सर्वात लहान होता म्हणून त्याला यंग जीनियस म्हणून बायजू ट्रॉफी चा तो मानकरी झाला. अभिजात संगीता बरोबरच अनिर्बन बासरीवर उपशास्त्रीय संगीत, धून, ठुमरी, कजरी, फ्युजन इत्यादी पण लिलया सादर करतो. “होनर बाज देश की शान” या रियालिटी शो क्या माध्यमातून अनिर्बनभारतातील सर्व घराघरात पोहोचला. या रियालिटी शोमुळे अनीर्बनला माधुरी दीक्षित, हेमा मालिनी, जयाप्रदा, परिणीती चोप्रा, करण जोहर, कुमार सानू, इ. दिग्गजांसमोर सादरीकरण करण्याची संधी मिळाली. मिर्ची अवॉर्ड सेरीमनी मध्ये सोनू निगम व उस्ताद तौफिक कुरेशी यांच्यासोबत त्याला सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली. कल्की गौरव पुरस्कार, शांघाय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, खेलो इंडिया युथ गेम्स इ. महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि निबंध कला सादर करून एक नवा आयाम निर्माण केला.

मैत्रेयी रॉय

मैत्रेयी ही अभिजात संगीताची विद्यार्थी असून मातोश्री श्रीमती चैत्राली रॉय यांच्याकडून वयाच्या अडीच वर्षांपासून गायनाचे धडे तिने गिरवण्यास सुरुवात केली. चैत्राली या पंडिता मंजुश्री पट्टनाईक यांच्या शिष्या होत. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून फक्त सुरावट ऐकली तरी मैत्रीण लगेच राग ओळखायची इतके तिच्यावर लहानपणापासूनच सांगितिक संस्कार झाले. आई सोबतच शांतनु भट्टाचार्य, अंजना नाथ यांच्याकडूनही मैत्रयीने अभिजात संगीताचे शिक्षण घेतले मैत्रेयी ने शास्त्रीय संगीता सोबतच ठुमरी, दादरा, टप्पा तसेच गझल गायकी मध्ये पण आपले प्रभुत्व सिद्ध केले आहे.

अशा या हरहुन्नरी दोन्ही भावंडांची बासरी व गायनाची जुगलबंदी पाहण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button