क्राईमजळगाव

निवडणुकीदरम्यान अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक S P Jalgaon

जळगाव : विधानसभा निवडणुकीला निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. त्यानंतर आता राज्यात महायुतीचा खातेवाटपाचा पेच सुटून शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं समोर आलं. राज्यात मतदारांनी महायुतीलाच पसंती दिल्याचं समोर आलं.

मात्र, जळगावात निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराने मतांसाठी धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारांची सहानभूती मिळवण्यासाठी जळगावमधील अपक्ष उमेदवाराने स्वतःच्या घरावरच गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. मतदानाच्या दोन दिवसाआधी ही घटना घडली होती. जळगाव पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव एलसीबीच्या पथकाकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. पोलिसांना सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय होता.

गोळीबार झाल्यापासून हे प्रकरण संशयास्पद होतं. तपासानंतर फिर्यादीच आरोपी निघाल्याचे समोर आलं. गोळीबार करून लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच त्याने प्रकार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं कसं घडलं हे प्रकरण ?

जळगावातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांच्या घरावर गोळीबाराची खळबळजनक घटना १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली होती. परंतु पोलिसांच्या तपासात सहानभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार शेख यांनी स्वतःच्या घरावर गोळीबार केल्याचा प्रकार जळगाव पोलिसांच्या तपासातून उघड झाला. अपक्षा उमेदवाराचं कृत्य पोलिसांनी उघडकीस आणलं.

जळगावमधील या अपक्ष उमेदवाराचं मेहरूण परिसरातील शेरा चौकात घर आहे. त्याने पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा अनेक बाजूने तपास केला. त्यानंतर अपक्ष उमेदवार उमेदवार शेख यांनी घरावर गोळीबार करण्याचे षडयंत्र रचल्याचे पोलीस तपासात समोर आले.

पोलिसांना सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकारात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय होता. गोळीबार झाल्यापासून हे प्रकरण संशयास्पद होतं. तपासानंतर फिर्यादीच आरोपी निघाल्याचे समोर आलं. गोळीबार करून लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच त्याने प्रकार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button