महावितरण प्रशासनाविरोधात कामगार महासंघाचे बेमुदत आंदोलन
नियमबाह्य बदल्यासाठी भरपावसात कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन
टीम आवाज मराठी, जळगाव | ०६ जुलै २०२३ | महावितरणने तांत्रिक कामगारांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य असून प्रशासकीय परिपत्रकाचा नियमभंग केलेला आहे. बदली प्रक्रियेची चौकशी जोवर होत नाही तोवर आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केलेली आहे. त्यासाठी दि. ६ जुलै पासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून पहिल्या दिवशी दिवसभर पाऊस सुरु होता, तरी पण भर पावसात कामगारांचे उपोषण निरंतर चालूच होते.
कामगार महासंघाने ४ जुलै रोजी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन बेमुदत धरणे आंदोलनाविषयी माहिती देण्यात आली आहे. या जळगाव विभागातील अनागोंदी कारभार समोर दिसून आलेला आहे. तसेच प्रशासकीय बदल्या व विनंती बदल्यांविषयी कंपनीचे निश्चित धोरण परिपत्रक ५१४ मध्ये नमूद केले आहे. तरी पण या परिपत्रकाला जळगाव विभागाने धाब्यावर ठेऊन या परिपत्रकात बदल्यांबाबतचे मार्गदर्शन तत्त्वांचे उल्लंघन करून वरिष्ठ तंत्रज्ञ पदाच्या १५ कर्मचाऱ्यांचे आणि तंत्रज्ञ पदाच्या ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेल्या आहेत.
महावितरणच्या जळगाव विभागाने सदर प्रशासकीय बदल्या ह्या नियमबाह्य पद्धतीने केल्या असून या बदलीच्या प्रक्रियेची चौकशी जोवर होत नाही तोवर त्याला स्थगिती मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र तरी सुद्धा बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याकरिता कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. तरी या प्रशासनाच्या मुजोर व मनमानी पद्धतीच्या नियमबाह्य कारभाराचा निषेध करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आलेले आहे. सदर या आंदोलनात झोन, विभागीय, सर्कल अशा तिन्ही कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.