क्राईमजळगावराज्य

चोपड्यात 45 लाखांचा 750 किलो गांजा जप्त

टीम आवाज मराठी,चोपडा/जळगाव दि. 08 ऑक्टोबर 2024 :- सोयाबीन आणि तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी सुमारे साडेसातशे किलो वजनाचा 45 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केल्याची कारवाई चोपड्या लागत असलेल्या डेडी बापाडा शिवारात केली आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स … आजचा रंग लाल…

संशयित रूमला चेचऱ्या पावरा रा.डेडी बापाडा याने शेतातील सोयाबीन आणि तुरीच्या पिकांच्या आड गांजाचे पीक लावलेले होते. याबाबतची माहिती पोलीस सूत्रांना मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली.

हा ओला गांजा जमा करून बाजार समितीच्या तोल काट्यावर मोजला असता त्याचे वजन तब्बल साडेसातशे किलो भरले. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा संशयित आरोपी रुमल्या पावरा पसार झाला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button