राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चार गुण घेत पुण्याचा प्रथमेश शेरला ओम लमकाने श्लोक शरणार्थी
नंदुरबारचा जितेंद्र पाटील ठाण्याचा अथर्व सोनी, जळगावचा अजय परदेशी मुंबईचा राम परब कोल्हापूरचा आदित्य सावळकर आघाडीवर आहेत
आवाज मराठी जळगाव दि. २5 -महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालांची नोंद करण्यात आली त्यात पहिल्या बोर्डवर स्पर्धेचा प्रथम मानांकित खेळाडू सोलापूरचा मानस गायकवाड फिडे मानांकन (२०४४ )यास मुंबईच्या ओम गाडा (१७७३) याने किंग्स इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात ४८ चालीत पराभव केला.
तर दुसऱ्या पटावर पुण्याचा द्वितीयमानांकित प्रथमेश शेरला (१९७८)याने इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या चुरशीच्या सामन्यात कोल्हापूरच्या रवींद्र निकम यांचा १२२ पराभव केला.
तिसऱ्या पटावर श्लोक शरणार्थी याने इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात पुण्याच्या किरण पंडितराव यांचा २९ चालीत पराभव केला चौथ्या पटावर पुण्याचा ओम नमकाने व मुंबईचा सौमिल गोगटे यांचा निमजोवीच पद्धतीने झालेल्या डाव छत्तीसव्या चाली अखेर बरोबरीत सुटला.
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पुण्याच्या प्रथमेश शिरला याने पुण्याच्या आदित्य जोशीचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर पुण्याच्या श्लोक शरणार्थी आणि अहमदनगरच्या आशिष चौधरीचा पराभव केला तर तिसऱ्या पटावर राम विशाल परब मुंबई याने नंदुरबारच्या जितेंद्र पाटील यांचा पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या पुण्याचा अविरत चव्हाण (१८८९)याचा पराभव केला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश मॉल येथे आयोजित
एच टू इ पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या
राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण १६३ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलेला असून ८० च्या वर फिडे मानांकित खेळाडू विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत.
स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे प्रवीण ठाकरे अभिजीत वैष्णव आकाश धनगर अरविंद देशपांडे अभिषेक जाधव हे काम बघत आहे
स्पर्धेची पाचवी फेरी सकाळी नऊ तीस वाजता होईलॉ