जळगाव (प्रतिनिधी) :- भरधाव दुचाकी मालवाहू रिक्षाला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना 30 रोजी एमआयडीसी परिसरात घडली या पकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
विजय मगन पाटील (वय ४०, रा. कौतिक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते भाऊ, वडिलांसह राहत होते. एमआयडीसी परिसरातील गुरांच्या बाजार परिसरात विजय पाटील हे पानटपरी चालवून उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी विजय पाटील हे उत्पन्न बाजार समितीजवळ जात असताना काशिनाथ लॉज जवळ एका रिक्षाला त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली.
त्यात गंभीर जखमी झालेल्या विजय पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नागरिकांनी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून विजय पाटील यांना मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.
ढोर बाजार परिसरात त्याची पानटपरी होती, त्यावर त्याच्या कुटुंबियांचा तो उदनिर्वाह करीत होता. सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुचाकीने जात असतांना काशीनाथ चौफुलीजवळील एचडीएफसी बँकेसमोर पुढे चालणाऱ्या ऑटोरिक्षावर आदळली. या अपघातात विजय पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ विजय पाटील याला रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकारी सीएमओ यांनी तपासणी करीत विजय पाटील याला मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या भावाने एकच आक्रोश केला. त्याच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईकांसह मित्रांची
रुग्णालयात धाव अपघातात विजय पाटील याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, त्याच्या नातेवाईकांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. यावेळी उपस्थितांकडून हळहळ देखील व्यक्त केली जात होती.