जळगाव

साहसाला तरुणींच्या उत्साहाची जोड…

शिवतीर्थ मैदानावर तरूणींचा दहिहंडी महोत्सवाची जळगावकरांना अनुभूती

आवाज मराठी जळगाव दि. २७ – गोविंदा रे गोपाला.. दहीहंडी फोड गोविंदा चा नामघोष.. प्रो लाईट अँड साऊंड शो रोषणाई तरुणींचे जल्लोषपूर्ण वातावरण… सोबत रोपमल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण… ३११ ढोल-ताशा वादकांचा एकाच वेळी गजर.. श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा तरुणींचा दहीहंडी महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला. साहसी खेळांमध्ये तरुणींना प्रोत्साहन मिळावं यासाठी आयोजित तरुणींच्या दहीहंडी महोत्सवाचा दहीहंडी फोडण्याचा मान ही स्पर्धा न आयोजित करता सर्वांना आनंद मिळावा म्हणून यावेळेस सर्वांना देण्यात आला.

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सवाप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित , कर्नल अभिजित महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, डॉ. भावना जैन, आशुली जैन, माजी महापौर जयश्री महाजन, विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, डॉ. अस्मिता पाटील, प्रतिभा शिंदे, पारस राका, अमर जैन,सुनील महाजन, शरद तायडे, स्वरूप लुंकड, डॉ कल्याणी गुट्टे-नागुलकर, प्रिती अग्रवाल, राजेश चोरडीया, सपन झुनझुनवाला, सचिन नारळे, गजानन मालपूरे, युवाशक्ती फाउंडेशनचे विराज कावडीया व शहरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहभागी दहिहंडी पथकांसमवेत ढोल पथकातिल कलावंत, रिल्स स्टार व नृत्य कलावंतांना घडविणारांचा चषक देऊन गौरविण्यात आले.

ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे यश यावर विशेष थीम घेऊन यंदाचा दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानुसार संपूर्ण दहीहंडी महोत्सवाची सजावट व रचना करण्यात आली होती संकल्पना राजेश नाईक यांची होती.

क्रेनच्या सहाय्याने सहा दहिहंड्या उभारल्या होत्या. यात दहिहंडी फोडण्याचा मान सर्व सहा महिला गोविंदा पथकांनी घेतला.

या शाळेतील गोविंदा पथकाने घेतला सहभाग

शहरातील नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. एच. रायसोनी महाविद्यालय असे एकूण सहा महिलांचे गोविंदा पथक सहभाग घेतला. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश होता.

मल्लखांब व शौर्यवीर पथक आकर्षण

तरुणींच्या दहीहंडी महोत्सवात शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक एकाच वेळी वादन करत होते. त्यासोबतच प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी करत होत्या. यासह प्रो लाईट अँड साऊंड शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरणाने तरुणींचा जल्लोष वाढविला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, जी एच रायसोनी स्कूल, किड्स गुरुकुल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमांसह ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते.
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन आणि जैन इरिगेशनच्या स्वयंसेवकांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. निवेदन अय्याज मोहसीन यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button